Friday, May 15

Tag: in the face of convention

A flurry of bogus journalists : सनासुदीच्या तोंडावर स्वयंघोषित बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

A flurry of bogus journalists : सनासुदीच्या तोंडावर स्वयंघोषित बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| बातमीदार हा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा,भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो, अशी सामान्य नागरिकांची भावना असते, मात्र काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याचा घाट घातला आहे. सध्या माहूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी वाहनांवर प्रेस लिहिलेले आणि ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले काही महाटख स्वयंघोषित बोगस पत्रकार राजकिय मंडळीवर,सर्वसामान्य नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस लिहून आम्ही ऑनलाइन मीडियाचे पत्रकार आहोत, असे प्रेस लिहिलेले ओळखपत्र गळ्यात घेऊन मोठ्या अविर्भावात फिरून नागरिकांसह शासकीय अधिकारी, राजकारणी मंडळींना त्रास देत असल्या...
error: Content is protected !!