Special service camp completed : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष सेवा शिबिर संपन्न
मुखेड/मुक्रामाबाद, बस्वराज वंटगिरे| तालुक्यातील मौजे देगाव येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे देगाव तालुका मुखेड जि. नांदेड येथे 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे श्रमसंस्कार विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे देगाव येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब (सचिव अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ) हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून भालचंद्र तिडके साहेब (स.पोलीस निरीक्षक-पो.स्टे. मुक्रमाबाद) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मुकुंदराज जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. रेखाबाई फुलेवाड (सरपंच देगाव) नागनाथ याचावाड (उपसरपंच), सौ नयन पोटे मॅडम (ग्र...
