Three people hanged : बिलोली तालुक्यात एक महिन्यात तिघांनी घेतला गळफास
बिलोली, गोविंद मुंडकर| गेल्या दोन महिन्यात बिलोली तालुक्यातील मिनकी व केसराळी येथील तीघांनी घरची हालाखीची परिस्थिती व आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका महिन्यातील तीन आत्महत्या यामुळे समाजमन ढवळून निघत असतानाचे चित्र दिसून येते.
गरीबी आर्थिक परिस्थितीमुळे होण-या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी समुपदेशनाचे कार्यक्रम राबविणे व शासनाच्यावतीने रचनात्मक ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यातील दि. ९ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील मिनकी येथील एका १८ वर्षीय युवकाने शैक्षणिक साहित्य, नवीन कपडे व मोबाईल घेण्यासाठी आपल्या शेतकरी बापाकडे पैशाची मागणी केली होती. ती मागणी पुर्ण झाली नसल्याने मुलाने रागाच्या भरात शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुसऱ्याच दिवशी मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आपण मुलाच...
