Subhash Wankhede warns : खत व बियाण्याच्या कृत्रिम टंचाई दाखवली तर जबर झटका देऊ – माजी खा. सुभाष वानखेडे यांचा इशारा
हदगाव, शेख चांदपाशा| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी कृषी विभाग व व्यापाऱ्यांना ठणकावून सांगितले की, हदगाव व हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणे उपलब्ध न झाल्यास तसेच बियाणे व खताचा कृत्रिम साठा निर्देशनास आल्यास संबंधित कृषी अधिकारी व व्यापाऱ्यांना जोरदार झटका दिला जाईल. ही बैठक नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (द्वितीय टप्पा – पोखरा) अंतर्गत हदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली अंबाळा या गावाच्या परिसरात हायटेक सभागृहात पार पडली.
या बैठकीत वानखेडे यांनी प्रेमळपणाने पण ठाम शब्दांत इशारा दिला की, जर कोणत्याही व्यापाऱ्याने खताची व बियाणे ची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांकडून जास्त दराने खत विकले, तर त्याची नोंद घेतली जाईल. एवढेच नव्हे तर कोणत्याहीव्यापाऱ्याच्या गोदाम...
