the new ‘Eblu Fio X’ : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्लू फिओ एक्स’ लाँच केली -NNL
मुंबई| गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज भारतातील पहिली फॅमिली ई-स्कूटर इब्लू फिओ एक्सच्या नवीन व्हेरिएण्टच्या लाँचची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील ईव्ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्पादन आहे. भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पो २०२४ मध्ये इब्लू फिओ एक्सचे अनावरण करण्यात आले होते.
इब्लू फिओ एक्स आता २८ लिटर स्टोरेज स्पेससह ऑफर करण्यात येईल. या ई-स्कूटरमध्ये २.३६ केडब्ल्यू बॅटरी असेल आणि ११० किमी रेंज देईल. इब्लू फिओ एक्सची किंमत ९९,९९९ रूपये (एक्स-शोरूम) असेल. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्हणाले, ''इब्लू फिओ एक्स आमच्या विद्यमान उत्पादनाबाबत ग्राहकांच्या अभिप्रायासह डिझाइन करण्यात आली आहे. या वेईकलमध्ये कालातीत डिझाइन असून उच्च दर्जाचा आरामदायीपणा देण्...
