हदगाव – हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडा – भाजपा कार्यकर्त्यांची मागणी – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधण्यासाठी आणि मतदार पुनर्निरीक्षणाच्या अनुषंगाने हिमायतनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळात होऊ घातलेली हदगाव - हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून भाजपात एकनिष्ठेने काम करणारे गजानन तुप्तेवार यांच्यासह बैठकीला उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच पक्षाने संधी दिल्यास आपण हि विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मत गजानन तुप्तेवार यांनी बोलुंन दाखवले आहे. त्यांच्या या मागणीला बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी समर्थन दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वाना लागले आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी विध...
