Saturday, May 30

Tag: gutkha traffic and gambling

illegal liquor, gutkha and gambling : हिमायतनगरात अवैध दारू, गुटखा वाहतूक आणि जुगार अड्ड्यांविरोधात बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा

illegal liquor, gutkha and gambling : हिमायतनगरात अवैध दारू, गुटखा वाहतूक आणि जुगार अड्ड्यांविरोधात बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा

क्राईम, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यात आणि शहरात अवैधरित्या देशी-विदेशी दारू, गुटखा आणि पानमसाला वाहतूक तसेच चौपाटी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांविरोधात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले असून, १० नोव्हेंबर २०२५ पासून हिमायतनगर पोलीस स्टेशनसमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. माधव शिंदे यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिमायतनगर तालुक्यासह शहरात रात्री उशिरा बोलोरो, लोडिंग पिकअप, कंटेनर ट्रक यांच्यामार्फत गुटखा, पानमसाला आणि देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक केली जात असून, हे सर्व पोलिसांच्या संगनमताने सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, शहरातील चौपाटी, उमर चौक, बाजार चौक, पार्डी रोड आदी ठिकाणी जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
error: Content is protected !!