nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL
वसमत/हिंगोली| विधानसभेचे बिल वाजले असून 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशक भरण्यास सुरुवात होणार आहे. अशी सूचना निवडणूक आयोगाच्या कडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वसमत विधानसभेसाठी श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे 24 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील संत महंतांच्या उपस्थितीत नामनिर्दशन पत्र भरणारा असल्याची माहिती पत्रकाद्वारे सांगितली.
वसमत विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गणला जातो सध्या या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून या ठिकाणी जनतेचा जनाधारावर श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत ते 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत या वेळी महाराष्ट्रातील संतमहतांची उपस्थिती राहणार आहे.
सध्या वसमत विधानसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावणार आहेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी विकासात्मक कामे जनतेच्य...
