Chandraprakash Deglurkar ; अमानवी रुढी परंपरांच्या विरोधात गुरु रविदासांनी संघर्ष केला – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
मुदखेड l भारतातील अमानवी रुढी परंपरा व विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करुन गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात सामाजिक समतेचा क्रांतीकारी विचार मांडला असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
गुरु रविदास चौक, मुदखेड जि. नांदेड येथे आयोजित गुरु रविदासांच्या ६२७ व्या जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व प्रखर वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रवीणदादा गायकवाड हे होते.
आपल्या प्रभावी भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व्या शतकात जी सामाजिक क्रांती केली तशी सामाजिक क्रांती गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात केली, त्यामुळेच आपले जीवनमान बदलू शकले. या देशात जनावरांना किंमत होती पण माणूस उपेक्षित ...
