Government schemes ; शेवटचा माणूस केंद्र बिंदू समजून शासनाच्या योजना राबवल्या जाव्यात
किनवट, परमेश्वर पेशवे l आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके महाराष्ट्र शासनाचा सर्व विभागाच्या योजनांचा शंभर दिवसात विकास कृती आराखडा तयार करण्याच्या हेतुने शेवटचा माणूस केंद्रबींदू माणून एकही घटक योजनांपासून वंचित राहाणार नाही. यासाठी अशा आढावा बैठका घेण्यात येत असल्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. १५ फेब्रुवारी रोजी मंत्री उईकेंचा किनवट दौरा होता. दरम्यान किनवट स्थित उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकरांची उपस्थिती होती. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसह आदिवासी शेतकर्यांच्या समस्या घेऊन व्हाॅईस आँफ मीडिया किनवटच्या पत्रकारांनी मंत्री उईकेंना निवेदन दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटच्या कार्यकक्षेती...
