Government efforts to ensure security : अल्पसंख्यांकांना सुरक्षिततेची हमी व मुख्य प्रवाहात आणण्याच्या शासन प्रयत्नाला आणखी गती मिळावी -NNL
नांदेड| भारतीय संविधानाचे गठन झाल्यानंतर देशातील अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेला काढून एकसंघ राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करणे आणखीही गरजेचे असल्याचा सूर आज झालेल्या अल्पसंख्यांक हक्क दिवसाच्या चर्चासूत्रात व्यक्त करण्यात आला.
जगभरात विविध ठिकाणी विविध जाती, धर्म, पंथ, भाषिक समुदाय, अल्पसंख्यांक ठरतात. बहुसंख्यांकांमध्ये अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व व त्यांच्या न्याय हक्काचे रक्षण व्हावे, यासाठी अशा समुदायांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जातो. 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय वार्षिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला आहे. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे आयोजन करण्या...
