Ram Tarate ; उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे ; साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम -NNL
नांदेड। शालेय जीवनातील वक्तृत्व कलेचा विकास होण्यासाठी कथाकथन हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असते. साने गुरुजी कथा मालेतून अशा प्रतिभावान कथा कथन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख तयार होते. तसेच यामधून विद्यार्थ्यांच्या उत्तम वक्तृत्व शैलीचा विकास होतो आणि व्यक्तिमत्त्वालाही आकार येतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार राम तरटे यांनी केले. ते साने गुरुजी कथामाला हेलस आयोजित, नांदेड जिल्हा कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शहरातील प्रियदर्शनी विद्या संकुल येथे अत्यंत देखण्या आणि भव्य स्वरूपात जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पद्माकर कुलकर्णी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, प्रियदर्शिनीचे अध्यक्ष बालासाहेब माधसवाड, विलास कोळनूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना व्...
