Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ८ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येत आहे. उद्याच्या अंकात सोबत असलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार आहेत.तसेच शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार असल्यामुळे वाचकांना ही लेख माला कशी वाटली याबद्दल मोजक्या शब्दात प्रतिक्रिया ९४२१८ ३९३३३ या व्हाट्सअप क्रमांक वर पाठवाव्या ही विनंती. - संपादक
पिएरलेस हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे सकाळी सहा वाजता बीचवर फेरफटका मारला. सूर्योदय होत असल्याचे दृश्य पाहून मन प्रफुल्लित झाले. सकाळी मिळालेल्या या सुंदर वातावरणाचा आमचे टुरिस्ट आपल्या परीने फायदा घेत होते.उज्वला व रमेश केंद्रे या योग प्रेमी जोडप्यांच्या मार्गदर्शनाखाली लता व शामसुंदर कदम,यशोदा व उद्धव चौधरी,उमा व विजय ...
