Island of andaman ; अंदमानच्या बेटावरून (भाग २) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक
बुधवारची सकाळ सुरू झाली ती पावसानेच. आम्हाला देवगिरी पकडायची होती नांदेड स्टेशनवरून. सर्वांना सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्म नंबर चार वर या म्हणून निरोप दिला होता. पावसातच सोन्या मारुती मंदिर व स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन अंदमान टूर यशस्वी करण्यासाठी साकडे घातले. आठ वाजून दहा मिनिटांनी स्टेशनवर पोहोचलो तर संदीप मैंद यांनी सर्वांना सूचना केली की, आज देवगिरी प्लॅटफॉर्म नंबर चार ऐवजी तीन ला येत आहे. आधीच पूर्व सूचना मिळाल्यामुळे सर्व लावाजमा प्लॅटफॉर्म नंबर तीन कडे रवाना झाला. आलेल्या सर्व टुरिस्टचे संदीप मैंद, जयश्री ठाकूर, विशाल मुळे, राजेशसिंह ठाकूर यांनी मोत्याची...
