Massive excavation of Murum : हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी–बोरगडी शिवारातून बेसुमार मुरूम उत्खनन
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी व बोरगडी शिवाराच्या मध्यभागातून गेल्या काही दिवसांपासून अंधाधुंद पद्धतीने गौण खनिज मुरूम उत्खनन सुरू असून, कायद्याची झालर पांघरून सुरू असलेल्या या बेकायदेशीर उत्खननाला संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा केला जात असून, हा मुरूम बोरगडी–धानोरा परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामासाठी वापरला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
परिसरातील शेतकरी नागरिकांच्या माहितीनुसार, गौण खनिज अधिनियमाला बगल देत १० फुटांहून अधिक खोल खोदकाम करण्यात येत असून, ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे रात्रंदिवस मुरूमाची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे जाणी...
