अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील चित्रकार रणजीत वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। "जगाला शांती कळेल" (THE WORLD WILL KNOW PEACE) या शिर्षकाखाली न्यूयॉर्क (UNITED STATE'S) शहरातील प्रसिध्द डासिया या गॅलरी मध्ये दि. १७ जून २०२४ ते दि २८ जून २०२४ या दरम्यान सुरु असलेल्या अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील प्रसिद्ध चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड होऊन सदर ठिकाणी ती चित्रे प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती आयोजक स्मृती सिरसाठ तथा अमृता कोच्चर यांनी दिली आहे.
सदर प्रदर्शनात भारतासह पाकीस्तान, दक्षिण आफ्रीका, लंडन येथील अंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात चित्रकारांचा समावेश असून माहूर सारख्या दुर्गम भागातून साता समुद्रापार अंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या व्यासंगाच्या माध्यमातून माहूर चे नाव सुवर्ण अक्षरांनी प्रसिध्द चित्रकार रणजीत दत्त वर्मा हे सातत्याने आपल्या कलेचे सादरीकरण करुन माहूरचे नाव विश्व स्तरावर पोहोचवीत आहेत हे...
