leopard attacks : भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क – वन मंत्री गणेश नाईक
नागपूर| राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना राबविण्यात येत असून भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही नागरिक मृत्यूमुखी पडणार नाही यासाठी यंत्रणा पूर्ण सतर्क करण्यात आली असल्याचे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केले. राज्यात वाढत्या बिबट्या हल्ल्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, सुनील प्रभु आदी सदस्य उपस्थित होते.
मंत्री नाईक म्हणाले की, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल-1 मध्ये असल्याने थेट कार्यवाहीस मर्यादा आहेत. त्यामुळे त्याचा समावेश शेड्यूल-2 मध्ये करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे. केंद्रीय वन विभागाने राज्यातील पाच बिबट्यांच्या नसबंदीला तात्पुरती ...
