New website launched for filling applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु – NNL
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन वेबसाईट (संकेतस्थळ ) सुरू झाले आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही पात्र लाभार्थ्याचा अर्ज शेवटी ऑनलाइन करावाच लागतो. तो एक तर स्वतः किंवा यंत्रणेद्वारे ऑनलाईन केला जातो जिल्ह्यामध्ये ज्यांना ऑनलाईन करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र आता संकेतस्थळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ज्यामुळे त्वरेने आणि सुलभरीत्या अर्ज अपलोड होतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जवळपास सहा लाखावर पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. उर्वरित महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. या योजनेतील महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत यासाठी शासनाच्यावतीने डब्ल्यू डब...


