HomeनांदेडSamadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

Samadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

नांदेड। उस्माननगर मंडळाअंतर्गत मौजे दहीकळबा येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” आज आयोजित करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत गावपातळीवर नागरिकांची कामे व्‍हावीत यादृष्‍टीने या शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असून जनतेने या शिबीराचा अधिकाधिक लाभ घ्‍यावा, असे आवाहन कंधारचे प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर गोरे यांनी केले आहे.

WhatsApp Image 2025 05 15 at 9.19.32 PM Samadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

यावेळी दहिकळंबा गावचे सरपंच अवधुत शिंदे, लाडकाचे सरपंच तानाजी शिंदे, ग्रा.प.सदस्‍य किशन शिंदे, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष मारोती शिंदे, नायबतहसिलदार उत्‍तम मुद्दिराज, तहसिल कार्यालयाचे सहा.महसूल  अधिकारी मोहिजे, उस्‍माननगरचे मंडळ अधिकारी गजानंद ऐनवाड, दहिकळंबा येथील ग्राममहसूल अधिकारी शहाजी निकम, शिराढोणचे ग्राममहसूल अधिकारी शिराढोण खंडू रेणके, आलेगावचे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री धनकुलवार, हळदाचे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती स्‍वाती किरकण, ग्रामसेवक श्रीमती कल्‍पना राठोड उस्‍माननगर मंडळातील कोतवाल उपस्थीत राहून योगदान दिले.

या शिबिरात ग्रामस्‍थांना शासनाच्‍या विविध योजनांची सविस्तर माहिती  दिली. यावेळी रहिवास उत्‍पन्‍न दाखले वितरण करण्यात आली. रेशन कार्डचे वितरण (ई रेशन कार्ड), संजय गांधी, श्रावण बाळ योजनांचे फार्म भरून घेण्‍यात आले. आधार कार्ड सेवा मार्गदर्शन व वाटप करण्‍यात आले. पीएम किसान योजनांची माहिती देण्‍यात आली. अॅग्रीस्‍टॅक योजनाचे आयडी काढून त्‍यांचे वाटप करण्‍यात आले. जिवंत 7/12 चे अगोदर नोंदणी केलेले वाटपाबाबत या शिबिरात माहिती देण्‍यात आली. नैसर्गिक आपत्‍ती अनुदान वाटप व ई-केवायसी संदर्भात मार्गदर्शन करण्‍यात आले. नागरीकांच्‍या तक्रारी व अडीअडचणीचे निराकरण करण्‍यात आले.  शिबिरासाठी उस्‍माननगर मंडळातील नागरिक व ग्रामस्थ बहूसंख्‍य संख्‍येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments