Sunday, June 28

Tag: fasting

hunger strike : आरडीसीच्या चपऱ्याश्याची हाकालपट्टी करण्यासाठी १० दिवसापासून उपोषण, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

hunger strike : आरडीसीच्या चपऱ्याश्याची हाकालपट्टी करण्यासाठी १० दिवसापासून उपोषण, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई फय्याज याच्यावर वशिलेबाजीचे आरोप होत असून, त्याची १४ वर्षांपासून एकाच ठिकाणी बदली न झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांशी तो हलगर्जीपणे वागत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून करण्यात आल्या आहेत. डीवायएफआय (DYFI) युवक संघटनेच्या वतीने दि. ६ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे दि. १० ऑक्टोबरपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना निवेदन देत मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. शिपायास मिळत असलेले “अभय” आणि वशिलेबाजीचा मुद्दा जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे टिकून राहणाऱ्या अध...
prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच सर्व उपविभागीय कार्यालये, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 15 ऑक्टोबर, 2024 रोजी अंमलात आला असू...
error: Content is protected !!