Crop insurance ; पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी -NNL
नांदेड। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाकडे मांडल्या. भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वर्ष २०२३ च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील ८ लाख १९ हजार ५९० शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी विमा काढला होता. गतवर्षीच्या जुलै व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी २ लाख ५० हजार २० दावे विमा कंपनीकडे दाखल केले होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार २९९ दावे मान्य करून १५४.६७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. तत्पूर्वी जुलैतील नुकसानानंतर उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होईल हे वि...
