Rabi season crop : रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत
नांदेड| नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, 2 निम्न पातळी बंधारे व 49 लघु प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी या प्रकल्पांवर रब्बी हंगाम सन 2025-2026 राबविण्याचे नियोजित आहे. रब्बी हंगाम, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी-नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात (नमुना नंबर 7, 7 अ) गुरूवार 20 नोव्हेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे उपकार्यकारी अभियंता आर. एस. पवार यांनी केले आहे.
सर्व धरणात 7 ऑक्टोबर 202...
