Naigaon Tehsil Office : दि.२२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा नायगांव तहसील कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा -NNL
नांदेड| जिल्ह्यातील नायगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे. राज्यकर्ते जातीपाती व धर्मामध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे द्यावे यासाठी पक्षविरहित,पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन शेतकरी- शेतमजूर हक्क समितीच्या वतीने दि.२२ ऑगस्ट गुरुवारी सकाळी १० वाजता हेडगेवार चौकातून नायगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत १) ई -पीक पाहणी नोंद रद्द करून सरसकट कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपये देण्यात यावे. २) खरीप हंगाम २०२३ काळातील पिक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. ...
