Wednesday, May 13

Tag: Dr. Shankarrao Chavan Medical College

planted 500 trees : डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपन

planted 500 trees : डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपन

नांदेड, आरोग्य
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी नांदेड परिसरात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र व एक पेड माँ के नाम 2.0 या देशव्यापी अभियानातर्गत 5 जुलै रोजी 500 झाडांचे वृक्षारोपन ( Dr. Shankarrao Chavan Medical College premises planted 500 trees) अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून, पर्यावरण आपल्याला स्वच्छ हवा, शुध्द पाणी आणि सकस अन्न पुरवते. पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही आपली सर्वाची नैतिक जबाबदारी असून, आपण सर्वानी एकत्र येवून पर्यावरणाचे संरक्षण केले तरच आपण एक चांगले भविष्य निर्माण करु शकतो असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले. पर्यावरणामध्ये विविध नैसर्गिक संसाधने आहेत. त्यांचे जतन आवश्यक असून, जेणेकरुन भविष्यात त्यांची कमतरता भासणार नाही. पर्यावरणातील सर्व...
error: Content is protected !!