S.R.T.M. University ; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन
नांदेड l विद्यापीठातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत प्राधिकरण बैठकीत विविध प्रस्ताव व प्रश्न विचारून त्यावर कारवाई करावी यासाठी सिनेट सदस्य डॉ. महेश मगर यांच्याकडून विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात ई मेल व्दारे निवेदन देण्यात आले होते परंतु विद्यापीठाच्या प्रशासनाकडून काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही व प्राधिकरण बैठकीत झालेल्या ठराव आणि निर्णयावर कार्यवाही विहित कालावधीत करण्यात आली नाही. तसेच नियमबाह्य कामे करण्यात येत होती त्याची चौकशी करण्यासाठी पत्र दिले होते.
परंतु सदर पत्रावरही कारवाई करण्यात आली नाही आणि विविध मागण्या बाबत विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी आज बुधवार दि.१२ मार्च रोजी सकाळी १0 वाजता स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्य...
