Nanded ; जिल्हा स्तरीय पुरुष व महिला वरिष्ठ गट ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन
नांदेड l नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे *दि.15 जून 2025 रोज रविवार सकाळी 7.00 वाजता पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय वझिराबाद नांदेड* येथील मैदानावर जिल्हास्तरीय 20 वर्षाच्या वरील पुरुष व महिला वरिष्ठ गटातील जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली . *राज्यस्तरीय स्पर्धा दि.23 जून 2025 या कालावधीत पुणे* या ठिकाणी संपन्न होणार आहेत .
स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी सोबत नाव नोंदणीसाठी एक फोटो , मुळ १० वी ची सनद , मूळ जन्म दाखला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, आधार कार्ड प्रत्येक क्रिडा प्रकारासाठी 200 रु शुल्क व प्रथम नोंदणी शुल्क १५० रु घेऊन उपस्थित राहावे. राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्पर...
