Saturday, June 27

Tag: Determination

village cleanliness : संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

village cleanliness : संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिरंजनी गावात स्वच्छता चळवळीला अधिक बळ देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील महिलांना स्वच्छतेचा वाण म्हणून कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या दिशेने एक ठोस व सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मेघा पवन करेवाड होत्या. पंचायत समिती हिमायतनगरचे विस्तार अधिकारी श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक श्री. विजय जंगीलवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती क्षीरसागर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात समूह आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप प्रभनकर यांनी महिलांना स्वच्छता, आरोग्य व आजार प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. घरगुती कचऱ्याच...
error: Content is protected !!