Nadva bridge : चार वेळा मंजूर होऊन हिमायतनगर शहरा जवळील नडव्याच्या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळेना
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून उमरखेड ढाणकीकडे जाणाऱ्या तसेच वरद विनायक मंदिर, कनकेश्वर महादेव दर्शनाकडे जाताना शहराला लागून असलेल्या नडव्याच्या फुलाचे काम मागील अनेक वर्षापासून मंजूर होऊन जैसे थेच (Despite approval four times, the work on the Nadva bridge near Himayatnagar city has not been started) आहे.
त्यामुळे अल्पसा पाऊस होताच पुलावरून पाणी वाहून जाऊन ये जा करणाऱ्या नागरिक, शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसह भाविक भक्तांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पुराचे पाणी पुलावरून जात असताना अलीकडे आणि पैलतीरावर नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. आतापर्यंत चार वेळेस या पुलाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र पूल निर्मितीच्या कामाचे घोडे कुठे आडकले हे कळने अवघड झाले आहे.
त्यामुळे भावीक भक्त व नागरिकांत बांधकाम विभाग वं स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत नाराजी व्यक...
