Dcm Ajit Anantrao Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित अनंतराव पवार यांचा परिचय -NNL
पवार, श्री. अजित अनंतराव, जन्म : २२ जुलै १९५९, जन्म ठिकाण : देवळाली प्रवरा, तालुका - राहुरी, जिल्हा - अहमदनगर., शिक्षण : बी.कॉम. ज्ञातभाषा :मराठी, हिंदी व इंग्रजी., वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा., अपत्ये : एकूण २ (दोन मुलगे).व्यवसाय : शेती., पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष., मतदारसंघ : २०१ - बारामती, जिल्हा-पुणे,
इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि. भवानीनगर; संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना, लि. संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि. जिल्हा पुणे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे; मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ तसेच डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा...
