Shree Guru Vitthalnath Maharaj ; श्री.गुरू विठ्ठलनाथ महाराज देवस्थान गोपाळ चावडी येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी
नवीन नांदेड l श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड दतनाम सप्ताह सोहळा 21ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता ,27 फेब्रुवारी रोजी गुरू विठलनाथ समाधीचा महाअभिषेक श्री समाधान महाराज यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता संपन्न झाला, यावेळी उपस्थित मान्यवरांनी व भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती,तर महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने वर्ष 55 व्या वर्षी तिर्थक्षेत्र गोपाळचावडी ता. जि. नांदेड येथे श्री गुरु विलनाथ महाराज मंदिर देवस्थान गोपाळावडी ता.जि. नांदेड येथे अखंड दत्तनाम सप्ताह पालखी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची रुपरेषा दि.21फेब्रुवारी रोजी 27 सोमवार पहाटे 5 वाजता श्री समगिरीजी गुरू जयगिरीजी महाराज, यांच्या हस्ते महापुजा , दत्तनाम सप्ताहास प्रारंभ झाला व सात दिवस अखंड ...
