माकप आणि सीटूच्या आंदोलनास १९८ दिवसाच्या साखळी उपोषणा नंतर यश -NNL
नांदेड। काही ५० - १०० व्हूज प्राप्त करणारे युट्युबर आणि काही तोडपाणीसाठी उपोषण करणारे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते तसेच काही लोकप्रतिनिधी माकप आणि सीटूच्या सुरु असलेल्या उपोषणातील मागण्या आता सुटणार नाहीत असा दावा करीत होते.
परंतु अखेर सर्व दावे फोल ठरवीत लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांनी अखंड संघर्ष करीत दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन करीत जेल भरो केला आणि महाराष्ट्र राज्य शासनास शासन निर्णय घेण्यास भाग पाडले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटी आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन जिल्हा कमिटीच्या अथक परिश्रमातून हा संघर्षशील इतिहास घडला आहे. माकप,जमसं,डीवायफ आणि सीटू च्या नांदेड येथील कार्यकर्त्यांनी १९८ दिवस साखळी उपोषणास बसून अखेर महाराष्ट्र शासनास जीआर काढण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या नावाने व ...
