Nanded ; नांदेड जिल्ह्यात घरकुल बांधणी; लाखो गोरगरीबांना मिळत आहे हक्काचं घर
नांदेड। ग्रामीण भागातील गोरगरीब, वंचित आणि आदिवासी कुटुंबांना निवारा मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात केली जात आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व तत्सम योजनांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ७८६ घरकुले पूर्ण झाली असून हजारो लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. यामुळे नांदेड जिल्हा घरकुल निर्मितीमध्ये आघाडीवर असून, अनेक योजनांमधून लाभार्थ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी दिली आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी १ लाख ५० हजार ७८५ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यापैकी १ लाख ४५ हजार ६९८ लाभा...
