Come on girls! : चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही ! -NNL
नांदेड| आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना तर जास्त प्रमाणात अडचणी येतात. त्यांना शहरात शिक्षणासाठी राहणे म्हणजे शैक्षणिक शुल्क सोडून इतर अनेक बाबींसाठी पैसे खर्च होतात. जसे की निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य खरेदी, प्रवास अशा एक ना अनेक गोष्टीच्या खर्चाच्या बोजा त्यांच्या पालकांना उचलावा लागतो. त्यामुळे मुलींना शिक्षण द्यावे की नाही या संभ्रमात अनेक कुटूंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती.
कुटूंबातील आर्थिक बाब ही कुटुंबाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे. या नव्या योजनेबद्दल बोलताना नांदेड येथे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील मुलींनी आपल्या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु आता महाराष्ट्र शासनाने मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात मोफत शिक्षण 8 जुलै...
