वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश – NNL
नांदेड| जूनमध्ये होणारी वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांची वृद्धी, शासनाच्या बांबू मिशनची अंमलबजावणी आणि लोकशाही दिनानिमित्त दाखल झालेल्या प्रलंबित तक्रारींचा तसेच जिल्हा व राज्यस्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील उच्चस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आला.
निवडणुका झाल्यानंतर शासन जोमाने कामाला लागले असून खरीपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या अनेक बैठका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बी -बियाणे, खते कीटकनाशके यांची उपलब्धता व त्या संदर्भातील आढावा तालुका स्तरावर जाऊन घेण्यात आला आहे. त्यानंतर शासन स्तरावरील काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळ...
