Cleanliness work ; स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला सुरुवात -NNL
नांदेड| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला जिल्हयात सुरुवात झाली असून १५ आँगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील स्वच्छतेला नवीन आयाम देण्यासाठी बचतगट संवाद मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. या मोहिमेचे उद्दिष्ट गावपातळीवर स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, शौचालयांचा नियमित वापर सुनिश्चित करणे आणि गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आहे.
बचत गटाच्या महिलांनी या मोहिमेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरात जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे, गाव मॉडेल करण्यासासंदर्भात चर्चा करावी. त्याबरोबर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना...
