Ashokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL
नांदेड l राज्य शासनाच्या वर्ग-३ व वर्ग-४ पदांवर कार्यरत स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीने मोठा दिलासा दिला असून, त्यांची सेवासमाप्ती होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा फलदायी ठरला आहे.
एका न्यायालयीन आदेशामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या होत्या. यातील काही लोकांनी तब्बल २५-३० वर्ष सेवा दिलेली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अन्यायकारक असल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यातील काही जणांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याविषयी राज्य सरकारकडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खा. चव्हाण यांनी तातडीने विविध पातळ्यांवर राज्य सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले....
