Friday, May 15

Tag: Chief Executive Officer Meghna Kavali

Chief Executive Officer Meghna Kavali : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अधिक सक्षम करावे — मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Chief Executive Officer Meghna Kavali : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अधिक सक्षम करावे — मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयपूर्ण योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अभियानातील सातही महत्त्वपूर्ण घटक गावपातळीवर प्रभावीपणे राबवून नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले. योजनेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद नांदेडच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या बैठकीस पर्यवेक्षाधीन आयएएस अनन्या रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कावली यांनी सांगितले की, सुशासनयुक्त पंचायत, ग्रामपातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभागातून श्रमदान, जलसमृद्ध-स्वच्छ-हरित गाव, मनरेगा संलग्न कामे, सक्षम पंचायत व उपजीविका या स...
Cleanliness service : जिल्‍हयात 17 सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवडा – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Cleanliness service : जिल्‍हयात 17 सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवडा – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 पंधरवडा दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छोत्सव या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे. या पंधरवड्यादरम्यान प्रमुख उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेशी निगडित प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहेत. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन क...
Chief Executive Officer Meghna Kavali : शिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही नारायण मिसाळ यांच्या कार्यशैलीची खरी ओळख – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Chief Executive Officer Meghna Kavali : शिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही नारायण मिसाळ यांच्या कार्यशैलीची खरी ओळख – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

करियर, नांदेड
नांदेड| जलजीवन मिशन व स्वच्छता अभियानांतर्गत नारायण मिसाळ यांनी कोणतेही काम माझे नाही असे न म्हणता, प्रत्येक काम कार्यक्षमतेने पार पाडले. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर ही त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी काढले. जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नारायण मिसाळ यांची बदली परभणी जिल्‍हयातील पुर्णा पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी म्हणून झाली. यानिमित्त आज जिल्हा परिषद नांदेडच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षातर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ मेघना कावली होत्या. कार्यक्रमास जलजीवन मिशनचे प्रभारी प्रकल्प संचालक अमित राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागा...
Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम सन 2020 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. यावर्षी माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे. या अभियानात निसर्गातील पंचमहाभूतांवर भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश यावर आधारित पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींमध्ये स्‍पर्धात्‍मक वातावरण निर्माण करण्यात येते. शासनाने निर्धारित केलेल्या टूलकिटमधील निर्देशांनुसार, ग्रामपंचायतींनी एप्रिल ते मार्च या कालावधीत विविध उपक्रम राबवायचे असून त्याची नोंद शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. त्यानंतर डेस्कटॉप व क्षेत्रीय मूल्यांकनाच्या आधारे उत्कृष्ट का...
Ceo Meghana Kavali ; पर्यावरण समृद्धीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Ceo Meghana Kavali ; पर्यावरण समृद्धीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पर्यावरण, आरोग्य व स्वच्छता उपक्रमांची जिल्ह्यात आजपासून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पर्यावरण शपथ घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते झाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, समाजकल्याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, अभियंता अशोक भोजराज, विशाल चोपडे आदी मा...
error: Content is protected !!