India Marathi Literary ; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशनार्थ बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा
भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे.
भाषा कुठून येते ? आपण ' मातृभाषा ' असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आईची जी भाषा ती मुलाची भाषा असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो काय ? लहान मुल त्याच्या परिसरातील भाषा आत्मसात करते.ते वाढत जाते , तसा त्याच्या परिसराचा विस्तार होतो आणि त्याचा त्याच्या भाषेवर परिणाम होतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरला ( औरंगाबाद ) राहणारे लोकं घराबाहेर पडले की अगदी सहज हिंदी बोलतात.आपण ज्या विक्रेत्याकडून भाजी घेत आहोत , तो ग्रामीण भागातून आलेला आपल्यासारखाच मराठी माणूस आहे , याचा जणू विसरच पडतो आणि ' मेथी क्या भाव है ? ' असा प्रश्न हाती भाजीची जुडी घेत सह...
