Fruits Vegetables and Spice Crops : तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला -NNL
नांदेड| भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाल्यामुळे २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनीच्या नियोजित 29 डिसेंबरच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला असून आता हे प्रदर्शन 2 जानेवारीपासून सुरू होणार आहे.शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
26 डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भारतातील प्रसिद्ध यात्रा माळेगाव येथे सटवाई मंदिराजवळ हे प्रदर्शन दोन ते चार जानेवारी या कालावधीत होणार आहे. माळेगाव यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा व प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पुरस्कार प्राप्त शेतकरी, स्टॉल धारक तसेच शेतातील फळे भ...
