Pre Monsoon Rain Nanded ; मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नांदेड शहरात पाणीच पाणी; नाले सफाई झाली नसल्याने सखल भागातील घरांत शिरले पाणी
नांदेड,अनिल मादसवार। शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी रात्री वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसामुळे नांदेड शहर परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून, शहराच्या विविध प्रभागात नाल्यांची सफाई केली गेली नसल्याने सखल भागातील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असल्याने त्यांना रात्र जागून काढावी लागली आहे, यामुळे महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या विरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आतातरी स्वच्छता विभागाने मान्सूनपूर्व नाल्याच्या सफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जाते आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवार, दि. १६ मे रोजी रात्रीच्या सुमारास शहर व जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरे...
