Violent sit-in movement by Diwasi community members : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाज बांधवांचे जोरदार धरणे आंदोलन -NNL
नांदेड| जागतीक आदीवासी क्रांती दिनानिमित्त गुरुवारी दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत आदिवासी कोळी समाजाच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी कोळी बोगस आहेत असा शब्द वापरणारे आ नरहरी झिरवळ, आ.डॉ किरण लाहामटे ,लकी जाधव यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि आदिवासी मंत्री यांच्यासोबत फक्त कोळी समाजाच्या हितासाठी घटनेप्रमाणे समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परत बैठक बोलवावी आणि कोळी नोंदीवरून जातीचे दाखले आणि जात वैधता मिळावी अशा सर्व मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शंकरराव मनाळकर कोळी महासंघ मराठवाडा अध्यक्ष, ...
