Do e-KYC for ration card activation : रेशन कार्ड चालु ठेवण्यासाठी ई-केवायसी करा;तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांचे आवाहन
किनवट,परमेश्वर पेशवे| रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. जर केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. शिवाय कार्डही अॅक्टिवेट राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर आताच रेशन दुकानावर जाऊन किंवा तहसील कार्यालयातील ई-केवायसी सुविधा केंद्रावर जाऊन तुमचं केवायसी करून घ्या,असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांनी केले आहे.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
ई-केवायसीमुळे रेशन कार्डधारकांची माहिती सरकारला मिळते. तसेच, रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतो. रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी कशी करावी?
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही खालील पद्धतीने ई-केवायसी करू शकता:
ऑनलाईन: घरी बसून तुम्...
