Wednesday, May 13

Tag: but the roads

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव नगर परिषदेच्या निवडणुका पार पडून नवे नगरसेवक निवडून आले, सत्ता स्थापन झाली; मात्र पदवाटपाचे राजकारण, विषय समितीच्या बैठका रद्द होणे या सगळ्यात शहरातील मूलभूत नागरी प्रश्न मात्र आजही जैसे थे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, क्रीडांगण, उद्याने, सभागृह यांसारख्या सुविधांची मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही त्याच जुन्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शहरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जीवघेणे खड्डे; अपघातांना निमंत्रण - शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आझाद चौक, राठी चौक, जामा मस्जिद रोडसह अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून चौकांमध्ये हायमास्ट दिव्यांची त...
error: Content is protected !!