Police raid illegal sand : पोलीसांनी अवैध रेती साठ्यावर छापे 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त तराफे केले जाळून नष्ट
नांदेड| नांदेड ग्रामीण, लिंबगाव व कुंटर पोलीसांनी अवैध रेती साठ्यावर छापे मारुन नदीपात्रात 02 इंजीन व 07 रेती काढण्याचे तराफे नष्ट करण्यात आले. आणि 20 ब्रास रेती असा एकूण 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध रेतीची उपसा व साठवणूक करणाऱ्यावर कारवाई कण्याचे दिलेल्या आदेशाचे पालन करून नांदेड ग्रामीण, लिंबगाव व कुंटर पोलीसांनी अवैध रेती साठ्यावर छापे मारुन अवैध रेती सह इंजीन व तराफे जप्त करून नष्ठ केले आहे.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सपोनि.विशाल भोसले, पो स्टे कुंदुर सपोनि पंढरी बोधनकर, पो स्टे लिबगाव यांनी व त्यांच्या टिमने दिनांक 24 ते 25/06/2025 रोजी पेट्रोलींग दरम्यान गोपनीय माहीतीवरुन आपआपले पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून गोदावरी नदीपात्रात इंजीन लावुन, तराफे वाप...
