Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL
शिवणी,भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील शिवणी येथे बैलपोळा भर पाऊसात उत्साहात साजरा सोमवारी सकाळपासून जोराचा पाऊस चालू होता त्यामध्ये बळीराजा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या बैलाला सजवून गावात बैलपोळ्यासाठी घेऊन आला पोळ्याची सुरुवात सोमवार दुपारी 4.30 मिनिटांनी पोळा फिरण्यास सुरुवात झाली.
जुन्या परंपरेनुसार आजही प्रथम बैल जोडी फिरवण्याचा मान गावातील मानकरी शंकरराव देशमुख यांना असतो त्यानंतर गावातील सर्व शेतकरी आपले बैल मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालतात यावर्षी बैलपोळ्याला तुफान पाऊस झाल्यामुळे भर पाऊसात पोळा उत्साहात साजरा केला हा पोळा सण साजरा करण्यासाठी गावातील सरपंच ,उपसरपंच , पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी उपस्थित होते...
