Tuesday, May 26

Tag: “Bring back the Mundhe!”: Angry protest

Bring back the Mundhe! “मुंढे परत आणा!” : नांदेडमध्ये दिव्यांगांचा संतप्त एल्गार, अंदाज समितीलाही घेराव

Bring back the Mundhe! “मुंढे परत आणा!” : नांदेडमध्ये दिव्यांगांचा संतप्त एल्गार, अंदाज समितीलाही घेराव

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड| “आम्हाला दिखाऊ कारभार नको, मुंढेंसारखा कडक आणि प्रामाणिक अधिकारी हवा!”—अशा घोषणांनी बुधवारी नांदेडचे वातावरण दणाणून गेले. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निषेधार्थ सकल दिव्यांग संघटनांनी थेट रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. कडक उन्हातही हातात मागण्यांचे फलक, तोंडात घोषणांचा आवाज आणि मनात तीव्र संताप—अशा वातावरणात आंदोलन पार पडले. विशेष म्हणजे, नांदेड दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही आंदोलकांनी घेराव घालत जाब विचारला. “कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला हटवून कोणाचा फायदा केला?” असा थेट सवाल करत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुंढे यांची बदली त्वरित रद...
error: Content is protected !!