Sunday, June 28

Tag: Big mistake in Himayatnagar’s voter list

Big mistake in Himayatnagar’s voter list : हिमायतनगरच्या मतदार यादीत मोठा घोळ; १५०-२०० मतदार प्रत्येक प्रभागात चुकीने दाखविल्याचा आरोप

Big mistake in Himayatnagar’s voter list : हिमायतनगरच्या मतदार यादीत मोठा घोळ; १५०-२०० मतदार प्रत्येक प्रभागात चुकीने दाखविल्याचा आरोप

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर येथील नगर पंचायत सन 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी (घोळ) (Big mistake in Himayatnagar's voter list) झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 1 ते 17 मधील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला असून, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे हिमायतनगर तालुका प्रमुख तथा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले राम भिमराव ठाकरे यांनी प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, सन 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदार यादीचा आधार न घेता, काही कर्मचारी व अधिकारी यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून घ...
error: Content is protected !!