Express feeder : हिमायतनगर तालुक्यात एक्सप्रेस फिडर लाईन पोल अवघ्या काही महिन्यात जमिनीकडे झुकले
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पळसपूर येथील 33 के. व्ही. विद्दुत केंद्रावरून घारापुर कडे जाणाऱ्या एक्सप्रेस फिडर लाईन पोलचे काम अत्यंत बोगस करण्यात आले आहे. केवळ रस्त्याच्या पाच फूट दूरवर पोल उभे करून करण्यात आले असून, नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्याने आणि हलक्याश्या वादळाने अनेक पोल जमिनीकडे झुकले तर काही ठिकाणी खाली पडले आहेत.
अर्धापूर- माहूर या राष्ट्रीय महामार्ग वरील घारापुर येथील वळण रस्त्याला लागून करण्यात आलेल्या नूतन लाईनचे पोल जमिनीकडे झुकले असून, या ठिकाणी रात्रीला वाहन जात असताना पोलला धडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सुदैवाने हा खांब रस्त्याकडे झुकला, हाच खांब जर शेतात पडला असता तर एखाद्या शेतकऱ्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरला असता. अश्या बोगस कामाची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे ...
