Thursday, May 14

Tag: Bear attack in Daryal Dhanora

Bear Attack Farmers : दयाळ धानोरा शिवारात अस्वलाचा थरार; सात शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

Bear Attack Farmers : दयाळ धानोरा शिवारात अस्वलाचा थरार; सात शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

नांदेड, कृषी, लाइफस्टाइल
इस्लापूर| किनवट तालुक्यातील दऱ्याळ धानोरा शिवारात बुधवारी सकाळी भीषण घटना घडली. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अचानक अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात दत्ता जाधव (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. इतर काहींवर किरकोळ उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर झुडपातून अचानक अस्वल बाहेर आले. काही कळण्याच्या आत त्याने सलग हल्ले केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शिवारात एकच खळबळ उडाली. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. जखमींना तत्काळ किनवट उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अस्वलाचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांनी शिवारात एकट्याने न जा...
error: Content is protected !!