Minister of State Meghna Bordikar : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
नांदेड| बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Minister of State Meghna Bordikar) यांनी आज येथे दिली. श्री गुरु गोविदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोर्डीकर नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ.मनोहर चासकर,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे , आमदार आनंदराव बोंडारकर, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.मनेश कोकरे, बाबा बलविंदर सिंग,बाबा सुखविंदर सिंह , सतीश लुसणावथ ,विनील चंद्र रांगा यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मंत्री महोदयांनी आदर्श स्टार्टअप म्हणून फ्लिपकार्ड ,paytm,झोमॅटो, स्वीगी, ओयो,ओला,नायका या सारख्या स्टार्टअपचे उदाहरणे देऊन युवकांना प्रेरीत केले. त्याप...
